सामाजिक

जय हिंद फूड बँकेच्या वतीने भगवान महावीर जयंती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवण वाटप

सोलापूर ( प्रतिनिधी )

भगवान महावीर यांच्या जयंती चे औचित्य साधून जय हिंद फूड बँक संस्थेच्या माध्यमातून, सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये जेवण, फळे, गोड पदार्थ वाटप करण्यात आले.
जय हिंद फूड बँकेच्या वतीने भगवान महावीर जयंती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या १०० नातेवाईकांना जेवण,संजय सुरवसे, व तसेच
चनबसप्पा सिद्राम गावसाने यांच्या कडून आजचे जेवण उपलब्ध करण्यात आले व हे जेवण जय हिंद फूड बँक तर्फे वाटप करण्यात आहे.

या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून संजय सुरवसे, सौ.सुरवसे ,सोलापूर जिल्हा व पर जिल्ह्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात.
उपचारा पेक्षा त्याच्या जेवणाचे खर्च जास्त असतात कदाचित हे खर्च जास्त असल्याने अनेक जण उपाशी झोपी जात असतात. संस्थेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी यांच्या भुक मुक्त भारत या संकल्पनेतून हे उपक्रम चालू करण्यात आले आहे.

गरजूं नातेवाईकांची जेवणाची सोय व्हावी यासाठी जय हिंद फूड बँकेच्या वतीने रोजच जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.

या वेळी सतिश तमशेट्टी, विपुल पुल्ली, शेखर तमशेट्टी, उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button