Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण

Admin by Admin
February 25, 2025
in सामाजिक
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
युवकांनी महापुरुषांच्या आदर्श विचारांची कास धरली पाहिजे – नरेंद्र गंभीरे 
सोलापूर ( प्रतिनिधी ): राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सोलापुरातील चार हुतात्मे यांच्यासह महापुरुषांनी आपल्या आदर्श कार्यातून समाज परिवर्तन घडविले. भारत देश हा युवकांचा देश आहे तेव्हा युवकांनी या आदर्श महापुरुषांच्या विचारांची कास धरली पाहिजे. त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. तरच चांगला समाज घडेल, असे प्रतिपादन सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी केले.
          श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी संध्याकाळी ५ वाजता रंगभवन समोरील समाजकल्याण केंद्रात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर रचना विभागाचे प्रथम लिपिक श्रीकृष्ण मस्तूद, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे माजी ग्रंथपाल नागनाथ नवगिरे, सुखकर्ता रुग्णालयचे डॉ.योगिराज बिराजदार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
         चेअरमन गंभीरे पुढे म्हणाले, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन विविध उपक्रम राबवत आहे. हे कौतुकास्पद आहे. अशा संस्थांना समाजातील सर्वांनी आधार आणि पाठबळ दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
         यावेळी शिवजयंती निमित्ताने १९ तास १९ मिनिटे १९ सेकंद दांडपट्टा चालवून विश्वविक्रम केल्याबद्दल आदिनाथ खंडेराव, सुयश हुच्चे या दोन मावळ्यांचा श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शाल व बूके देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थापक महेश कासट यांनी केले. सुत्रसंचालन प्रशांती काटवे यांनी केले तर आभार गणेश येळमेली यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे, महेश ढेंगले, दिपक करकी, श्रीनाथ श्रीरंग, अभिजीत व्होनकळस, प्रकाश आलंगे, विजय जाधव, शिवराज नगरकर, नागेश गंडगे, सुरेश लकडे, महेश बुब, मनुश्री कासट, अक्षता कासट, उमा मुगुंड, रुपा कुत्ताते, भारती जवळे, वंदना आलंगे, शुभांगी लचके आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 
 — चौकट – या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान
युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील
विवेक ओझा (वित्त व लेखा व्यवस्थापक-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर मंडळ कार्यालय), डॉ.निखिल नवले (वैद्यकीय), शशांक भोसले (अम्बिशन इन्स्टिट्यूट), प्रा.रेखा राजमाने (एस ई एस पाँलिटेक्निक सोलापूर), महेश भाईकट्टी (सामाजिक-अनुभव प्रतिष्ठान), चेतन देवरकोंडा ( इव्हेंट मँनेजमेंट) आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
Previous Post

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी  भीमराव शिंदे यांची निवड

Next Post

भारतीय बौद्ध महासभा शाखा सोलापूर  तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

Admin

Admin

Next Post
भारतीय बौद्ध महासभा शाखा सोलापूर  तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

भारतीय बौद्ध महासभा शाखा सोलापूर  तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697