राजकीय
तुमचे मतदान वाया गेलं असं वाटू देणार नाही : – खासदार प्रणिती शिंदे

अक्कलकोट (प्रतिनिधी): सत्कारापेक्षा काम सांगणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, म्हणून मी तुमची अडचण विचारण्यासाठी, सोडवण्यासाठी आली आहे. कामासाठीच नव्हे तर मला तुमच्या सुखदुःखातही सामील करून घ्या तुम्हाला माझ्यापर्यंत यायला कोणत्या पुढार्याची नेत्याची गरज लागणार नाही आणि मला तुम्हाला भेटायला कोणाची गरज नाही. एकमेकांना भेटायला कोणाची गरज नसते तेव्हाच लोकशाही जिवंत राहील. तुम्ही मला खासदार बनवलं यामुळे माझ्यामुळे तुम्ही नाही तुमच्यामुळे मी आहे. संविधानाचा एक भाग म्हणून आमदार खासदार काम करतात तुम्ही मला निवडून दिलात मला खासदार केलात त्यामुळे तुमचे मतदान वाया गेलं असं वाटू देणार नाही. कामाचं काय जादू आहे हे मला माहित आहे असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेटी दौऱ्यानिमित्त पानमंगरूळ येथे बोलताना व्यक्त केले.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पंधरा वर्षे कामामुळे आमदार झाले. माझ्याकडे बँक, कारखाने काही नाहीत माझ्याकडे मतदाराला देण्यासाठी फक्त काम आहे, आणि माझ कामावर विश्वास आहे जो काम करतो त्याच्यामध्ये लोक असतात. तीनदा आमदार झाले. चौथ्यांदा जनतेला वाटले की मी काम करते म्हणून मला खासदार म्हणून निवडून दिलात. कामाशिवाय लोकशाहीमध्ये दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते. काम करण्याच्या हेतूने गाव भेट दौरा सुरू आहे. कोणता अधिकारी जर काम करत नसेल तर ते मला चालणार नाही. अधिकारी काम करणारे पाहिजे, कारण मी काम करते मला जनतेची कामे करायची आहेत.
यावेळी ग्रामपंचायत मंगरूळ गावकऱ्यांच्या विविध मागण्यांचे पत्र लेखी पत्र खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
यावेळी माजी उपसभाचे प्रकाश हिप्परगी, अशपाक बळुरर्गी, अकबर मुजावर, ग्रामविकास अधिकारी शिवानंद सोलापुरे, अण्णाप्पा अरबाळे, सचिन बनसोडे, मा. उपसरपंच मलिक मुजावर, अण्णप्पा अरबाळे, सचिन बनसोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.



