Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आ.राजेश पवार यांच्या निषेधार्थ नरसी येथे रास्ता रोको व बाजारपेठ बंद

Admin by Admin
October 15, 2024
in सामाजिक
0
आ.राजेश पवार यांच्या निषेधार्थ नरसी येथे रास्ता रोको व बाजारपेठ बंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगांव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )आमदार राजेश पवार यांनी बौद्ध आणि मातंग समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून दोन समाजात फूट पाडण्याचे बेताल वक्तव्य केले या कारणावरून तालुक्यातील नरसी येथील बाजारपेठ बंद ठेवून रास्ता रोको करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे नरसी येथे दि. 11 ऑक्टोंबर रोजी नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी विकास कामाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नरसी चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला पाहिजे असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते या कारणावरून युवा नेतृत्व साईनाथ कांबळे जिगळेकर व सामाजिक कार्यकर्ते देविदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात नरसी येथे भाजपाचे आमदार राजेश पवार यांचा निषेध म्हणून दि.15 ऑक्टोंबर रोजी येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला होता. यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
नरसी येथील पोलीस चौकीच्या बाजूला निषेध सभा ठेवण्यात आली होती यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्यसचिव माधवदादा जमदाडे,जिल्हा अध्यक्ष अनिल शिरसे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर, खाकीबा सूर्यवंशी, माधव वाघमारे,प्रीतम गवाले, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड,श्याम गायकवाड, दिनेश सूर्यवंशी, गंगाधर कोत्तेवार, आदींनी निषेध सभेला संबोधित केले व निषेध सभेचे सूत्रसंचालन लालबा सुर्यवंशी यांनी केले.
यानंतर रस्त्यावर उतरून आमदार राजेश पवार यांच्या प्रतिमेला चप्पलने मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जळबा सूर्यवंशी,रमाकांत सूर्यवंशी,अशोक सूर्यवंशी,बबलू नरसीकर, संदीप उमरे, सचिन भेदे,मौला चांद पटेल,शुभम भेदे,गजानन सूर्यवंशी,प्रकाश सूर्यवंशी,सुभाष सूर्यवंशी,अमोल सूर्यवंशी आदीने परिश्रम घेतले.

Previous Post

वरचे संकेत मिळताच नितीन नाईकनवरे लागले कामाला

Next Post

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार

Admin

Admin

Next Post
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697