Sunday, September 6, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज – माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
January 20, 2025
in शैक्षणिक
0
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज – माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट (प्रतिनिधी ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज आहे. सध्या स्पर्धेचे युग असून उच्च शिक्षणाची कास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी धरावी. चिक्केहळळी सारख्या भागात व्हिजन इंडिया प्री स्कूल कडून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम सुरू आहे. या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचे काम करावे असे प्रतिपादन  माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. 

नोबेल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित व्हिजन इंडिया प्री स्कूल चिक्केहळळी  या स्कूलचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन अक्कलकोट शहरातील टिनवाला मंगल कार्यालय येथे दिनांक १७ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी  उद्योजक रईस टिनवाला माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड , माजी सरपंच  संजय डोंगराजे माजी सरपंच श्रीशैल माळी , अकील बागवान इस्माईल फुलारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिक्केहळळी गावच्या सरपंच श्रीमती फतरूमा  पटेल होत्या. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले , थोर समाज सुधारक क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. नोबेल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन इरफान मुल्ला यांच्या हस्ते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूल हेड एडवोकेट श्रीमती मुल्ला यांनी करून स्कूलच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. शैक्षणिक वर्ष सन २०२४ -२५ मधील विविध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व मेडल देऊन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या स्नेहसंमेलनात स्कूलमधील छोट्या मुला मुलींनी इंग्रजी , मराठी , हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थित दर्शकांची मने जिंकली. या कार्यक्रमास पोलीस पाटील योगेश जाधव कल्लप्पा ढोणे शेटप्पा म्हेत्रे सुधीर मचाले सुरेश जमादार मिलिंद देशमुख कल्याणी पाटील , मल्लिनाथ भासगी, काशिनाथ चिकमळ वाहिद हारकुड पत्रकार नंदकुमार जगदाळे स्वामीराव गायकवाड राजेश जगताप आदींसह पालक , शिक्षक , विद्यार्थी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे शिक्षक सुरवसे यांनी केले तर आभार विद्यार्थिनी आसिफा जमादार यांनी मानले.
Previous Post

मनोज शिंदे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण!

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण!

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158340
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697