शैक्षणिक

अक्कलकोट शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतरण 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतरण करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण “श्री स्वामी समर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अक्कलकोट” असे करण्यात आले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  मनोज ठाकरे, उपअभियंता  अमोल खमितकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोटचे अध्यक्ष . राजशेखर हिप्परगी, उपाध्यक्ष  यशवंत  धोंगडे, तसेच  सुरेश भालचीम , . ओंबसे , . दिलीपकुमार गायकवाड , . नदाफ , . मंठाळे ,. पिंटू हिंडोले,  महेश पाटील, . प्रथमेश इंगळे यांसह सर्व कर्मचारी वर्ग आणि संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button