धनंजय सावंत यांच्या हस्ते भैरवनाथ शुगर सोनारी १७ वा गळीत हंगाम मोळीपूजन कार्यक्रम संपन्न

परंडा ( फारूक शेख )भैरवनाथ शुगर सोनारी कारखाना गाळपास सज्ज
.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत ,
.प्रा. शिवाजीराव सावंत (चेअरमन, भैरवनाथ शुगर्स समुह) यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय सावंत यांच्या शुभहस्ते १७ वा गळीत हंगाम मोळीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने गव्हाणची पूजन करून मोळी पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना दराडे ,सारिका अंधारे ,गंगाताई सातपुते ,सोहम दादा सावंत ,अविनाश वाडेकर , ठोंबरे साहेब, काळे साहेब ,भोसले , गडगे ,गोविंद कुलकर्णी, सिंग ,सुरेश साळुंखे , बोरकर ,मालवदे दादा काळे सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. तसेच यावेळी पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक, तोडणी ठेकेदार सर्व खाते प्रमुख ,विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असताना ,या हंगामात उच्चांकी गाळप करत यशस्वीपणे कारखाना चालवण्याचा संकल्प .धनंजय सावंत यांनी व्यक्त केला. “साखर उद्योग हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा आहे, त्यामुळे त्यांची प्रगती आमची जबाबदारी आहे, अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.