राजकीय

पतीच्या प्रचारार्थ सरसावल्या सुरेखाताई इंगळे 

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांच्या धर्मपत्नी सुरेखाताई इंगळे या प्रचारार्थ सरसावले आहेत .गेल्या पंधरा दिवसापासून त्या पती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांच्या प्रचारासाठी सर्वत्र फिरत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांच्या प्रचारासाठी पत्नी सुरेखा इंगळे या ग्रामीण भागातील विविध गावात प्रचार दौऱ्यात सहभागी होत आहेत. सुरेखाताई इंगळे या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पती संतोषकुमार इंगळे यांना प्रचारामध्ये मोलाची साथ देत आहेत. ग्रामीण भागातील विविध गावात जाऊन विशेषतः महिला मतदारांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन सुरेखाताई इंगळे या करत आहेत .
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांच्या प्रचारासाठी ग्रामीण भागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने पदयात्रा कॉर्नर बैठक तसेच मतदारांशी संवाद साधत प्रचार सुरू केला आहे या प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांच्या पत्नी सुरेखाताई इंगळे या उतरल्याने  वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मोठे पाठबळ मिळाले आहे.पतीच्या प्रचारासाठी सुरेखाताई इंगळे या प्रचारात उतरल्याने याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button