परंडा मतदारसंघातील गुंडगीरी संपवण्यासाठी डॉ. राहुल घुलेंना संधी निवडून दया : नवनाथ वाघमारे

परंडा ( फारूक शेख )
विधानसभा मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी या मतदारसंघातील मतदारांनी परिवर्तन घडवुन राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉ राहुल घुले यांना एकदा निवडून द्या या मतदारसंघातील दडपशाही गुंडगिरी संपवून टाकू असे आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केले.
डॉ राहुल घुले यांच्या प्राचारार्थ परंड्यात रॅली काढण्यात आली यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे मराठवाडा संपर्क प्रमुख आश्रुबा कोळेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष ड. विकास पाटील, नाना मदने, पंडित मारकड, मनोज पाडुळे, गजानन सोलंकर, परंडा विकास सेवा सोसायटीचे संचालक अब्दुल पटेल उपस्थीत होते.
राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारात बुधवार दिनांक १३ रोजी रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना राहुल घुले म्हणाले परंडा मतदारसंघात
दडपशाही गुंडगिरी वाढली आहे या मतदारसंघात गोळीबाराच्या घटना घडत आहेत लोकांना कायद्याचा धाक राहिली न नाही. महायुतीचे उमेदवार डॉ तानाजी सावंत यांनी मला २६ तारखेनंतर जेलमध्ये घालतो आशी धमकी दिली आहे. मी अशा धमकीना घाबरत नसून या मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा मला आशीर्वाद आहे मतदारांनी २० नोहेंबरला मतदान रुपी आर्शीवाद द्यावा असे अहवान डॉ राहुल घुले यांनी केले.