राजकीय

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर येत्या दि. २० डिसेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपुर्ण बैठक

 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार

मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.त्यामुळे सर्व पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रिपब्लिकन पक्षाने ही कंबर कसली आहे.येत्या दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता बोरिवली गेराई खाडी येथील हॉटेल बेव्हुच्य सभागृहात मुंबई प्रदेश मधील रिपब्लिकन कार्यकर्त्यांची महत्त्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे या बैठकीस प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांनी या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दर्थ कासारे यांनी केले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकिसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारी अर्ज येत्या २३ डिसेंबर पासुन स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे.मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांची आपल्या मित्र पक्षासोबत जागा वाटपाची रसीखेंच सुरू आहे.त्या पार्श्वभुमीवर महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला सुध्दा मुंबई मधील महत्वाच्या जागा आपल्या वाट्याला मिळविण्याची अपेक्षा आहे. . १९९२ पासुन रिपब्लिकन पक्षाचे मुंबईतील जे बाल्लेकिल्ले आहेत ते बालेकिल्ले सांभाळण्या बरोबरच रिपब्लिकन पक्षाचा जो विस्तार झाला आहे.सर्व जाती धर्मीय कार्यकर्त्यांना सुध्दा पक्षातुन उमेदवारी द्यायची आहे.या पार्श्वभुमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला २५ जागा तरी पदरात पाडुन घ्याव्या लागतील.या सर्व विषयावर विचारविनिमय करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील आपली रणनिती, मुंबई महानगरपालिकेतील आपले संभ्याव उमेदवार निश्चित करण्यासाठी ; मुंबई महानगरपालिका निवडणुक लढण्यासाठीची व्यूहरचना या बैठकीत करण्यात येणार आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.ही महत्वाची आणि निर्णायक बैठक असल्यामुळे मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश ची ही महत्वपुर्ण बैठक बोरिवलीतिल गोराई खाडीजवळ व्हु हॉटेलच्या सभागृहात दिनांक २० डिसेंबर ला २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.रिपब्लिकन पक्षाच्या महिला युवक आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दर्थ कासारे यांनी दिले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button