सोलापूर

डॉ बाबासाहेब आंबेडकराच्यां जयंतीदिनी हजारो भीम अनुयायांना पाणी बॉटलचे वाटप

 

प्रशांत  गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम
सोलापूर – ( प्रतिनिधी )
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्यावतीने गेल्या १८ वर्षापासून भीम अनुयायांना पाणपोईची सोय करण्यात येते.
यंदाच्या वर्षीही हजारो भीम अनुयायांना पाणी बॉटल चे वाटप खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी,  शिक्षण अधिकारी कादर शेख, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवासेना प्रमुख सागर शितोळे,  सुमित वाघमोडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रशांत गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी अरुण क्षीरसागर, सचिन घोडके, गिरीश जाधव, उमाकांत राजगुरू , संजय कांबळे, पद्मसिंह शिंदे उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button