Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

देशाच्या विकासासाठी  काँग्रेसने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्वसमावेशक विकास पोहोचवला – सिद्धाराम म्हेत्रे

Admin by Admin
November 12, 2024
in राजकीय
0
देशाच्या विकासासाठी  काँग्रेसने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्वसमावेशक विकास पोहोचवला – सिद्धाराम म्हेत्रे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) 
निवडणुकीतील खोटे “जुमले” आणि पोकळ आश्वासनांनी जनता आता थकून गेली आहे. तालुका आणि राज्याचा खरा विकास साधण्यासाठी, विकासाच्या नावावर फसवणूक करणाऱ्या सरकारला यंदा जनता आपल्या मतदानाच्या अधिकाराने धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या विकासासाठी  काँग्रेसने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्वसमावेशक विकास पोहोचवण्याची परंपरा कायम राखून आपला शब्द पाळला आहे.महाराष्ट्राच्या सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी व महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गावकऱ्यांना केलं. 
  अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तडवळ भागातील  गावांना काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सोमवारी भेट देऊन  गावकऱ्यांशी मनमोकळे पणाने सुसंवाद साधला.
ते सोमवारी कुमठा, सुलेरजवळगे, चिंचोळी न, केगांव बु,शेगाव, धारसंग, कल्लकर्जाळ,कोर्सेगांव, आळगे, खानापूर  आदी तडवळ भागातील गावांना भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवानंद पाटील, संजीव पाटील, महादेव पाटील, महादेव बहिरगुंडे, सुखदेव भिसे, प्रकाश पाटील,पिंटु पाटील, के,एस.लालसंगी, प्रकाश हिप्परगी, शिवसिद्ध बुळळा, आनंद बुक्कानूरे, बंदेनवाज कोरबू,  राजकुमार वाघमारे, अशोक निंबर्गी, सिद्धाराम बाके, आंबाराव घोडके, पिरोजी शिंगाडे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 केगाव खु गावाला भेट दिली असता गावकऱ्यांशी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले  महायुतीच्या सत्ताकाळात सर्वसामान्य जनतेसोबतच शेतकरीही गंभीर अडचणीत आले आहेत. बी-बियाणे आणि खते यांच्या वाढलेल्या किंमती तसेच वस्तूंच्या  किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे  जनसामान्यांच्या सुद्धा महागाईने जनतेला त्रस्त केले आहे. फक्त आश्वासनांची खैरात करणाऱ्या या सरकारला आता सत्तेतून दूर करण्याची वेळ आली आहे,सर्व सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून  खऱ्या अर्थाने विकास साधणारे, जनहिताचे सरकार येऊ शकेल. मला विश्वास आहे की, राज्य व तालुक्याच्या प्रगतीसाठी तुम्ही परिवर्तन घडवून महाविकास आघाडीचेच  सरकार निवडा असे आवाहन केले.
Previous Post

दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध , महादेव कोगनुरे : गावभेट दौऱ्यादरम्यान मनसेला प्रतिसाद

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राजकीय फटाके फुटू लागले !

Admin

Admin

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राजकीय फटाके फुटू लागले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697