राजकीय

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आजी-माजी आमदारांचां प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण ! वंचित ,रासपकडूनही जोरदार प्रचार सुरू 

अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) २५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात असून ग्रामीण भागातील प्रचारावर सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारानी जोर दिला आहे. भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रचारात आघाडी घेत प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. वंचित आघाडी आणि रासपानेही ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहेत .
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सहा पक्षाचे उमेदवार हे निवडणूक लढवीत आहेत. तसेच सहा अपक्ष उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला करून प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. भाजपा उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी हे ग्रामीण भागात दिवस-रात्र एक करून प्रचार करत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मैंदर्गी दुधनी जेऊर वागदरी तडवळ बोरामणी वळसंग कुंभारी करजगी नागणसूर हैदरा शिरवळ हन्नूर चपळगाव आळगी कोर्सेगाव उडगी सातन दुधनी , पान मंगरूळ , दहिटणे , आळगे बासलेगाव तोळनूर आदींसह सर्वच गावांचा दौरा हा भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कॉर्नर सभा , पदयात्रा ,बैठका , प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संवाद यावर भर दिला आहे. रात्री उशिरापर्यंत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रचारावर भर दिल्याने भाजपा उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांची चर्चा मतदारसंघात सुरू आहे .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह युवा नेते मिलन कल्याणशेट्टी , हनूर गावचे उपसरपंच युवा नेते सागर कल्याणशेट्टी  सह भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी , नेते हे प्रचारासाठी जीवाचे रान करत आहेत .ग्रामीण भागातील प्रचाराचा पहिला टप्पा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पूर्ण केला आहे. तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ही अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात प्रचाराचा जोर वाढविला असून प्रचाराचा त्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुधनी मैंदर्गी जेऊर वागदरी करजगी तळवळ तोळणूर नागणसूर हैदरा शेगाव उडगी, शिरवळ कुंभारी बोरामणी वळसंग , किणी घोळसगाव आदीसह विविध गावांचा दौरा करून मतदार संघात  मतदारांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधत आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ग्रामीण भागातील प्रचारावर जोर देत प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचार दौऱ्यास मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे .माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे युवा नेते प्रथमेश म्हेत्रे काँग्रेस पक्ष महिला आघाडी तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे युवानेते शिवराज म्हेत्रे आदींसह काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी हे प्रचारासाठी ग्रामीण भागात फिरत आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे कॉर्नर सभा पदयात्रा तसेच प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी कार्यकर्त्यांशी संवाद यावर भर देत प्रचारावर जोर दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी ग्रामीण भागात  प्रचार करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी संवाद यात्रा काढून प्रचार फेरी पूर्ण केली आहे. वंचित आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी ग्रामीण भागात पदयात्रा , कॉर्नर सभा यावर भर दिला आहे . रासपचे उमेदवार सुनील बंडगर यांनीही अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात प्रचारावर जोर दिला आहे. सुनील बंडगर हे दररोज दहा ते बारा गावांना भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. कॉर्नर सभा , पदयात्रा यावर सुनील बंडगर यांनी भर देऊन प्रचारात विकासाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या प्रचार दौऱ्यामुळे रासप पदाधिकाऱ्यात उत्साह वाढला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी , काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केल्याचे दिसत आहे. तर रासप चे उमेदवार सुनील बंडगर , वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनीही प्रचारात आघाडी घेत ग्रामीण भागात प्रचारावर जोर दिल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button