सोशल मीडियावर पोलीसाचीं नजर – पो .नि. राजेंद्र टाकणे

सोशल मीडियावर अक्कलकोट पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियावर अक्कलकोट तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट , वैयक्तिक टीका, धार्मिक टीका, जातीय तेढ निर्माण करणारी टीका फेसबुक , व्हाट्सअप , इंस्टाग्राम व तसेच इतर समाजातील माध्यमांवर होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. कोणत्याही धर्माच्या जातीच्या समाजाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट सोडू नयेत. कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वादग्रस्त विधान , चित्रफित फोटो ठेवू नये. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेच कृत्य करू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी केले आहे.अक्कलकोट विधानसभेची निवडणूक पाहता उत्तर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील समाज माध्यमांवर पोलीस प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष असून समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना व्हाट्सअप फेसबुक व इंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमांवर पोलिसांची नजर आहे.आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे व पोलिसांना सहकार्य करावे .एखाद्या पोस्ट मधून कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोस्ट टाकणाऱ्या सोबतच व्हाट्सअप च्या एडमिनला देखील जबाबदार धरले जाईल व त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी सांगितले आहे.