Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत  ९३१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Admin by Admin
October 31, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत  ९३१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) २५०  अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात दक्षिण पोलीस स्टेशन अंतर्गत ७४ गावे आहेत. दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत  ९३१ जणांवर कलम १०७ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे .विधानसभा निवडणुकीनिमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील   महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती    भागात सोलापूर  जिल्ह्यात सर्वाधिक चेक पोस्ट दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत  असल्याची माहिती दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिली. 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्रे असलेली गावे दुधनी मैंदर्गी नागणसूर सुलेरजवळगे करजगी तडवळ पान मंगरूळ जेऊर ही आहेत. दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत महाराष्ट्र सीमावर्ती भागात चेक पोस्टवर एकात्मिक तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये महसूल अधिकारी , पोलीस अधिकारी, वनविभाग अधिकारी आरटीओ अधिकारी, आयकर विभाग , जीएसटी अधिकारी यांचा समावेश आहे.अक्कलकोट विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिण पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी हे अलर्ट मोडवर  असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी सांगितले.
चौकट – सोशल मीडियावर करडी नजर , नागरिकांनी घ्यावी काळजी – सोशल मीडियावर समाज माध्यमांवर प्रकट होत असताना कोणत्याही जातीच्या धर्माच्या तसेच व्यक्तिगत भावना दुखावू नयेत .याकडे कटाक्षाने लक्ष असल्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी सांगितले. व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व इतर  समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना  कोणाच्याही भावना दुखावू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना सर्वाधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी यावेळी केले आहे. जर कोणी समाज माध्यमांवर सोशल मीडियावर व्यक्तिगत धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यावेळी पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

सोशल मीडियावर पोलीसाचीं नजर – पो .नि. राजेंद्र टाकणे

Next Post

केरु रामचंद्र जाधव यांचे निधन

Admin

Admin

Next Post
केरु रामचंद्र जाधव यांचे निधन

केरु रामचंद्र जाधव यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697