सोलापूर
वटवृक्ष मंदीर समितीची पारंपारिक कार्यपध्दती लक्षवेधक – मा.आ.ॲड.दिलीप सोपल

अक्कलकोट ( प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून स्वामींच्या दर्शनाकरिता स्वामीभक्त या नात्याने मी अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात येत असतो. येथील दर्शन व्यवस्था अत्यंत उत्तम आहे. आजच्या व्यवहारीक जगात सर्व भाविकांना मोफत स्वामी दर्शनाची सोय ही मंदिर समितीची जमेची बाजू आहे. मंदीर समितीच्या
या ना अशा अनेक कार्यातून स्वामी नामाचा प्रचार आता जगभर विस्तारित होत आहे. स्वामींच्या या विस्तारित नाम प्रचारामुळे
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची पारंपारिक कार्यपद्धती ही लक्षवेधक ठरत असल्याचे प्रतिपादन बार्शी तालुक्याचे माजी आमदार ॲड. दिलीप सोपल यांनी केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार दिलीप सोपल यांचा श्री. स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी माजी आमदार सोपल बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी व अन्य उपस्थित होते.
