रोजगार सेवकांना मिळणार प्रति महिना आठ हजार रुपये पगार

महाराष्ट्रातील रोजगार सेवकांनी मानले मुख्यमंत्र्याचे आभार
नायगाव / नांदेड ( सय्यद अजिम नरसीकर )महाराष्ट्रातील रोजगार सेवकांनी गेल्या अनेक वर्षापासून पगार वाढीसाठी मोर्चे उपोषण धरणे आंदोलन करून आपली मागणी वेठीस धरली होती परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील रोजगार सेवकांना प्रति महिना आठ हजार रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर सर्व रोजगार सेवक यांनी संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले.
राज्यातील रोजगार सेवक यांची प्रत्येक ग्रामपंचायतला नियुक्ती झाल्यापासून केवळ तुटपुंजा मानधनावर काम करीत होते पगार कमी कामे मात्र जास्त असताना त्यांनी आपली जिद्द न सोडता अनेक वेळा पगार वाढीसाठी शासन दरबारी मागणी केली, अखेर त्यांच्या मागणीला यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्राप्त झाले असल्याने आता दर महिना आठ हजार रुपये पगार रोजगार सेवकांना मिळणार, म्हणून महाराष्ट्रातील रोजगार सेवक यांनी संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली तर नवीनजी गवळी, अमोल वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोरेगाव नेस्को हॉल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी खा. हेमंत पाटील व राजू शेवाळे यांचीही उपस्थिती होती, नायगाव तालुक्यातील रोजगार सेवक प्रकाश बैलकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी ढगे,नरसी रोजगार सेवक दत्ता गागलेगावे, उत्तम हनुमंते, प्रकाश गारोळे,यादव हनवटे,रावसाहेब बेलकर,हनुमंत परडे,दत्ता गायकवाड,सुभाष पवार,राजाराम रोडे,दत्तराम कानगुले,संतोष इबितवार,प्रल्हाद वारगडे,धोंडीबा बेंद्रीकर, राजकुमार वाघमारे,विठ्ठल कवळे, गणपत ढगे,धोंडीबा गायकवाड,संताजी पांढरे, चंद्रकांत शिंदे,तिजारे यासह तालुक्यातील सर्व रोजगार सेवक यांचाही या आभार कार्यक्रमात सहभाग होता.