राजकीय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी अक्कलकोट दौऱ्यावर

विविध विकासकामांचे होणार भूमिपूजन आणि जाहिर सभेचे आयोजन
अक्कलकोट, ( प्रतिनिधी ) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मंगळवारी )अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार असून राजे फत्तेसिंह मैदानावर जाहिर सभा होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता
काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे.त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याकडे
सर्वांचे लक्ष लागले आहे.महायुती सरकारने अक्कलकोटच्या विकासासाठी नेहमी झुकते माप दिलेले आहे. इतका निधी तालुक्याला कधी मिळालेला
नाही. खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटसाठी अनेक योजनांना मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.यात अक्कलकोट येथील उपजिल्हा रुग्णालयाला ११० कोटी, अक्कलकोट शहराच्या अमृत – २ या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ७२ कोटी,देगाव शाखा कालव्याचे जलपूजन, वितरिका क्रमांक एक व दोनचे भूमिपूजन, दुधनी नगर परिषदेसाठी ४७ कोटीची नवीन पाणीपुरवठा, अक्कलकोट
नगर परिषदेच्या विविध रस्ते प्रकल्पासाठी ११४ कोटीचे भूमिपूजन, मैंदर्गी नगर परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे २६ कोटीचे भूमीपूजन,अक्कलकोट- तडवळ-
कोर्सेगाव रस्ता,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
अशा विविध रस्ते कामांनाही कोट्यावधी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे.
ही सर्व कामे आता लवकरच सुरू होत
आहेत.या सर्व कामांचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
केले जाणार आहे.या दौऱ्या दरम्यान फत्तेसिंह
मैदानावरील जाहीर सभेतच कुरनूर धरणातील
पाण्याचे पूजन देखील केले जाणार आहे. .भूमिपूजन सोहळ्यानंतर अक्कलकोट येथील फत्तेसिंह मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
सकाळी १० वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत.तरी या सभेला तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी,नेते मंडळी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,
असे आवाहन अक्कलकोट शहर व तालुका भाजपच्यावतीने करण्यात आले आहे. राजे फत्तेसिंह मैदानावरील जाहिर सभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याची पाहणी केली. यावेळी युवा नेते मिलन कल्याणशेट्टी, माजी सरपंच प्रदीप पाटील , आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे ,परमेश्वर यादवाड , सिध्दाराम टाके, बंटी राठोड , बाळा शिंदे , निजप्पा गायकवाड , मल्लिनाथ करपे, रुषी लोणारी आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
