सामाजिक

नशाबंदी मंडळ अक्कलकोट तालुका प्रतिनिधी पदी पिरपाशा पिरजादे यांची निवड 

अक्कलकोट (प्रतिनिधी ) नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य अक्कलकोट तालुका प्रतिनिधी पदी तोडून येथील सामाजिक कार्यकर्ते फिरपाशा पिरजादे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये देण्यात आले.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने पिरपाशा पिरजादे यांची  तालुका अक्कलकोट करिता नशाबंदी व व्यसनमुक्तीवर काम करण्यास अक्कलकोट तालुका प्रतिनिधी” म्हणून ३ वर्षाच्या कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून तरुण पिढीला व व्यसनाधारी लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचा उद्देशाने गेली ६६ वर्षे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याचबरोबर दारुबंदी चळवळ सुरु ठेवली. महात्मा गांधी नंतर सन १९५८ साली महात्मा गांधीजींचे गुरु परमपुज्य केदारनाथजी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महात्मा गांधीजींची दारुबंदीची चळवळ सुरु रहावी म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. सदर मंडळाचे अध्यक्ष म्हणून विधानसभेचे माजी सभापती . वि. सा. पागे, माजी राज्यपाल .सयाजीराव शेलम, माजी मंत्री व ज्येष्ठ गांधीवादी नेते . बाळासाहेब भारदे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमुर्ती जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी सारखे दिग्गज मान्यवरांनी या मंडळाचे अध्यक्षपद भुषविलेले आहे. तोळणूर येथील सामाजिक कार्यकर्ते पिरपाशा पिरजादे यांची  अक्कलकोट तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सोलापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा मार्गदर्शक धर्मराज काडादी प्राध्यापक नरसिमा पठाण , माजी आमदार विश्वनाथ चाकोते सिद्धेश्वर साखर कारखाना व्हाईस चेअरमन सिद्धाराम   चाकोते ,सोलापूर नशाबंदी संघटक रुस्तुम कंपली सिद्धाराम गांगोडा सोलापूर विद्यापीठ कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, हेमा चिंचोळकर , गुरप्पा दरगोंडा आदींच्या उपस्थितीमध्ये पिरपाशा पिरजादे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.. पिरपाशा पिरजादे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button