शैक्षणिक
सिमा मडिखांबे यांचा आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अंबरनाथ येथे गुणवंत आदर्श शिक्षिका हा पुरस्कार सिमा गौतम मडीखांबे यानां प्रदान करण्यात आला. अबंरनाथ येथे जावसई गुरुकुल इंग्रजी हायस्कुल मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सिमा गौतम मडिखांबे यानां आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार विद्यमान आमदार बालाजी किणीकर अंबरनाथ विधासभा जि.ठाणे यांच्यां हस्ते महात्मा गांधी विद्यालय. येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक मतदार संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा ५ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी मुख्याद्यापक शिक्षक आणि शिक्षिका आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सिमा मडिखांबे यांना आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.