सामाजिक

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून रविवारी प्रस्थान 

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून रविवारी प्रस्थान झाली. सदरचा हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २८ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २९ वे वर्ष असून, या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू.वे.शा.स.मोहनराव गोविंदराव पुजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी प.पू अण्णू महाराज पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पादुकाच्या पूजनाने करण्यात आले.

न्यासाच्या महानैवद्या बरोबर अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी श्रींचे पादुकासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानैवद्य पूजा संपन्न झाली.

महाप्रसादालयात पालखी पुजानंतर न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर व श्री भवानी माता मंदिर येथे पालखी पूजन करून, अन्नछात्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ येथे आरती, श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवछत्रपती, शिवाजी महाराज चौक (बस स्थानक) येथील श्री खंडोबा मंदिरातील आरती नंतर सोलापूरकडे पालखी मार्गस्थ झाली. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम तर मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
या पालखी प्रस्थान सोहळ्यास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, सुरेशचंद्र सूर्यवंशी, कैलास वाडकर, सायबण्णा जाधव, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, प्रा. शिवशरण अचलेर, चंद्रकांत तथा पिट्टू सोनटक्के, वैभव नवले, रामदास तांबे, दिनेश हळगोदे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, पालखी पुरोहीत संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, श्रीकांत झिपरे, मंगेश सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी, आकाश गडकरी, गणेश भोसले, प्रशांत शिंदे-साठे, शिवा मंगरुळे, स्वप्नील मोरे, योगेश पवार, अतिश पवार, शुभम सावंत,  एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, महादेव अनगले, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राहुल इंडे, दत्ता माने, सुमित घाडगे, , लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, यांच्यासह भक्तगण सेवेकरी, वारकरी, कर्मचारी आदीजण उपस्थित होते.

चौकट : 
श्री सेवा : न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावोगाव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे येता येत नांही, अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत. असे नियोजन ह्या परिक्रमेच्या माध्यमातून होत आहे.

चौकट :
अपूर्व संधी : श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भाक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी आपल्या गावी येत आहे. या योगे श्री स्वामी चरणी तन-मन-धनाने निष्ठा व सेवा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी भक्तांना प्राप्त होत आहे.

चौकट :
न्यासाकडून सर्वोतोपरी सहकार्य :श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्र न्यासाच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत, आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम्र राबविले जातात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.

चौकट :
भक्तांच्या सेवेर्थ : -मंडळाच्या मालकीच्या जागेत यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास या निवासी या निवासी इमारती कार्यारत असून स्वमिभक्तांच्या सेवेत लवकरच भव्य असे महाप्रसादगृह इमारत रुजू होत असून सध्या महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु झाले आहे. ही भव्य इमारत ५ मजली असून त्यावर ५१ फुटी श्री स्वामींची मूर्ती असणार आहे. ही इमारत वातानुकुलीत असून बांधकाम क्षेत्र १,०९,३९७ चौ,फु. इतके आहे. या इमारतीत एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील व ५००० भाविक प्रतीक्षेत असतील इतक्या क्षमतेची आहे. याचा अंदाजित खर्च रक्कम रु. ६५ कोटी इतका अपेक्षित आहे. न्यासाच्या परिसरात सध्या स्वामी भक्तांच्या सेवेत तात्पुरत्या महाप्रसाद गृह बरोबरच श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर (नवसाचा गणपती), श्री भवानी माता मंदिर, नियोजित महाप्रसाद गृह इमारत स्टकचर, कपिला गाय, उभी स्वामी मूर्ती, कारंजा, शिवस्मारक, इनडोर-औटडोर जिम, प्रशस्त वाहन तळ, बालोध्यान शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशामक, रुग्णवाहिका, राज्य परिवाहन महामंडळाच्या चालक व वाहकांना करिता अध्यावत राहण्याची सोय, सौर उर्जा प्रकल्प याबरोबरच विविध दिन उत्सव, पोर्णिमा, चतुर्थी, एकादशी आदी कार्यक्रम न्यास साजरा करते.

चौकट :
सन २०२५-२६ मध्ये ८ महिने पालखी : –
गेल्या २८ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो. याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अ.नगर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून देखील मागणी होत आहे. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले-९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५ यांना संपर्क करण्याचे आवाहन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष  अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे. सदर पालखी परिक्रमा ही ८ महिने महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक १५ जुलै २०२५ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button