राजकीय

विधानसभा अपक्ष उमेदवार आसिफ जमादार यांची वाशी येथे संवाद  यात्रा संपन्न

परंडा ( फारूक शेख )भुम परंडा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आसिफ जमादार यांनी वाशी शहरातील सय्यद शहा अब्दाल रहमतुल्लाह अलैही वाशी दर्ग्यावरून चादर चडउन फात्याखानि करून प्रचाराला सुरुवात केली असुन गळ्याची टाय चिन्हावर मतदान करावे यासाठी प्रत्यक्षात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. गेल्या पाच सहा वर्षापासून समाजसेवेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गोरगरिबाची सेवा करून न्याय देणारे मुस्लिम व बहुजन यांच्या हक्काची व संघर्षाची लढाई लढणारे आसिफ जमादार यांना मतदाराकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे .
त्यांचे निवडणुक चिन्ह गळ्याची टाय असुन आज मतदारांच्या भेट घेत असताना काही मतदारांनी त्यांना करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांना आश्वासित केले व त्यांचे स्वागत केले आहे. तर उमेदवार आसिफ जमादार मतदारांशी संवाद साधत आहेत.
एक होमगार्ड शेतकऱ्याचे लेकरू आसिफ जमादार प्रस्थापिताचे विरोधात लढत असलेल्या लढाईत मतदार राजा त्यांच्यासोबत आहे असे नागरिकांतुन चर्चा आहे.
यावेळी संवाद यात्रा सुरू करताना बाबु काझी, गौस शेख, रफिक खान सोलापुर जिल्हा अध्यक्ष मुस्लिम एकता, जफर पठाण,अखिलेश जमादार तसेच वाशी शहर व तालुक्यातील मतदार बांधव उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button