राजकीय
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची ९ नोहेंबर रोजी सोलापूर येथे जाहीर सभा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार ०९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मागास सेवा मंडळ चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर या ठिकाणी होणार असून सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जनतेला सुजाण बंधू आणि भगिनींना नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी करावी असे आवाहन सोलापूर शहर – जिल्ह्याच्या सर्व यूनिटच्या वतीने करण्यात आले आहे .