शैक्षणिक
कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा स्पर्धेत अव्वल ..

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली आहे. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु.अल्फिया पठाण हिने दुसरा क्रमांक मिळवला असून 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवली आहे. नितेश कत्ते याने भालाफेक या खेळ प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून गोळा फेक या प्रकारात तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. बसलींगप्पा कालीबत्ते याने गोळा फेक या क्रीडा प्रकारात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला असून, लांबउडी या स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. श्रेयस सावंत या विद्यार्थ्याने बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. 19 वर्षाखालील मुलीच्या क्रिकेट संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून कबड्डी स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक कुमार जाधव व रंजना चव्हाण यांचे संस्थेचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभागप्रमुख रूपाली शहा, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
