सोलापूर
सायली सचिन जवळकोटे यांचे निधन

सोलापूर : सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे
(वय ५४ ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी २ वाजता वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपभावानी रोड येथे होणार आहे.त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले.आकाशवाणी अन् आजतक चॅनेलसाठीही काम केले.लोकमत सोलापूर’चे कार्यकारी संपादक . सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे आहेत.