Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे ईद-ए-मिलाद चा जुलूस सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून तिसऱ्या दिवशी १९ तारखेला  जुलूस काढण्याचा निर्णय 

Admin by Admin
September 16, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे ईद-ए-मिलाद चा जुलूस सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून तिसऱ्या दिवशी १९ तारखेला  जुलूस काढण्याचा निर्णय 

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट: ( प्रतिनिधी ) ईद-ए-मिलाद (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) जुलूस तिसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय  अक्कलकोटमधील मुस्लीम बांधवानी घेतला आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
यावेळी गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी आले  असल्याने अक्कलकोट मध्ये पैगंबर जयंतीची मिरवणूक दोन दिवस पुढे ढकलून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याचा निर्णय जुलूस कमिटीने घेतला असल्याचे कमिटीचे शुकुर शेख यांनी  सांगितले. पैगंबर जयंती म्हणजेच ईद-ए-मिलाद हा मुस्लिमांचा सण १६ सप्टेंबर रोजी आहे. याचवेळी गणेशोत्सव १६ व १७ रोजी साजरा होत आहे. गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती निमित्त मिरवणुकीचा अक्कलकोट मध्ये एकच मार्ग आहे. 
पैगंबर जयंती दिवशी सकाळी अक्कलकोट शहरातील माणिक पेठ येथून जुलुसची सुरुवात होते. माणिक पेठ कारंजा चौक,आरिफ शेरीकर चौक,मेन रोड कापड लाईन,फुलारी चौक, फत्तेसिंह चौक,नाईकवाड गल्ली रजिअल्लाह टेक, ए-वन चौक,बस स्टॅन्ड विजय कामगार चौक, हन्नुर चौक,बुधवार पेठ, ह्या प्रमुख मार्गावरून होऊन शेवटी माणिकपेठ  येथे जुलूसची समाप्ती होते.
अक्कलकोट शहरात ठिकठिकाणी जुलूस मध्ये सहभाग असलेल्या लहान मुला मुलींना शरबत मिठाई मसाला दूध पाणी ठिकठिकाणी वाटप करण्यात येत.
या जुलुस मध्ये अनेक मुस्लिम बांधव रिक्षा वरती डेकोरेशन रिक्षा सजावट करून जुलूस मध्ये सहभाग घेतात आणि संध्याकाळी अक्कलकोट शहरातील प्रमुख कारंजा चौकामध्ये जुलूस मध्ये सहभाग घेतलेल्या रिक्षा सजावट केलेल्या  पारितोषिक ट्रॉफी देण्यात येते.
अक्कलकोट शहरातील सर्व गणपती विसर्जनाचे मिरवणूका शहरातील प्रमुख चौक असल्याने संध्याकाळी गर्दी होते म्हणून मुस्लिम बांधवांनी ईद चा जुलूस व पारितोषिक वितरण समारंभ 
गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती उत्साहात साजरी करता यावी, दोन्ही धर्माच्या सणांना कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पैगंबर जयंतीची मिरवणूक गणेश विसर्जन झाल्यानंतर म्हणजे १९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय अक्कलकोट मुस्लिम बांधवांनी व जुलूस कमिटीने घेतला आहे.

Previous Post

सायली सचिन जवळकोटे यांचे निधन

Next Post

सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

Admin

Admin

Next Post
सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697