मनोरंजन
अक्कलकोट येथे विघ्नहर्ता डान्स स्टुडिओ आयोजित तालुकास्तरीय गरबा दांडिया स्पर्धा संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): नवरात्र उत्सवा निमित्त अक्कलकोट शहरातील विघ्नहर्ता डान्स स्टुडिओ आयोजित तालुकास्तरीय गरबा दांडिया स्पर्धा संपन्न झाली. सदरची स्पर्धा ही एवन चौकातील विठ्ठल मंदिरासमोरील मैदानात पार पडली. या स्पर्धेत लहान मुली व तरुणीनी सहभाग घेतला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक व डान्स प्रशिक्षक सोनू वाघमोडे, चित्रकार कलाकार सचिन घंटे,तालुका क्रिकेट प्रमुख सागर बनसोडे, सहाय्यक सागर सुतार, दौलप्पा जोगदे, स्वामीराव वाघमोडे, मयुरी पुरोहित, सुनिता हिडोळे प्रायोजक स्मिता महेंद्रकर, मनीषा धोंगडे, शितल झिंगाडे,व बसवराज भोले, विजयराज खेडगीकर आदीनी परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेत्यांनां ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
