सामाजिक

राजाभाऊ सरवदे  यांच्या वाढदिवस निमित्त  नागणसुर जिल्हा परिषद कन्नड मुले – मुली शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय  शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप

अक्कलकोट (प्रतिनिधि) – रिपाइं प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या  67 वा वाढदिवस निमित्त नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुले – मुली शाळेतील 300 विद्यार्थ्यांना रीपाई अक्कलकोट तालुकाध्यक्ष  अविनाश मडीखांबे यांच्या हस्ते नागणसुर शाखेच्या वतीने शैक्षणिक साहित्य,वह्या आणि केळी ,चॉकलेट खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसलिंगय्या स्थावरमठ होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य बसवराज मंटगी,प्रसाद प्रचंडे  उपस्थित होते .व्यासपीठावर अंबादास गायकवाड,अप्पा भालेराव,प्रकाश गडगडे मुख्याध्यापक विद्याधर गुरव, श्रीशैल दोडमनी ,लक्ष्मीकांत नागोजी,महादेव चीक्कळी, हुच्चप्पा अलामेल आदी उपस्थित होते .
 प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .यावेळी शैक्षणिक साहित्य,वह्या आणि खाऊ वाटप करून रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे बोलताना म्हणाले, राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या वायपट खर्चाला फाटा देऊन जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून या वेळी वाढ दिवस साजरा केल्याने नक्कीच गरीब विद्यार्थांना आधार मिळणार आहे .अत्यंत प्रतिकूल परिस्तीथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीची हात दिल्याने नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास उंचावेल या निस्वार्थ भावनेने हा उपक्रम राबवित असल्याचे प्रतिपादन केले.या वेळी प्रसाद प्रचंडे आणि बसवराज मंटगी यांनी ही उपक्रमाचे कौतुक करून शालेय विकासासाठी नेहमी प्रयत्न शिल राहण्याचे आश्वासन दिले.
  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्याधर गुरव, श्रीशैल दोडमनी ,बसय्या स्वामी, शरणप्पा फुलारी,राजशेखर कूर्ले,लक्ष्मीकांत तळवार,खाजप्पा किणगी, शांता तोळणूरे, चन्नम्मा बिराजदार,राजशेखर खानापुरे,शिवशरण म्हेत्रे विजयश्री एंटमन आदींनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्याधर गुरव यांनी केले तर आभार शरणप्पा फुलारी यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button