महाराष्ट्र
अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचा सोलापूर शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग यांचे कार्यालयास सोलापूर जिल्हा कामगार सेनेच पदाधिकाऱ्यानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोलापूर जिल्हा कामगार सेना अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने अप्पर आयुक्त अभय गीते यांचा स्वामी समर्थांचा प्रतिमा देऊन शाल श्रीफळ देऊन कामगार सेना जिल्हाध्यक्ष साहेबांना तेगेंळी , अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख बांधकाम कामगार जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे , अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर कामगार सेना शहर उपप्रमुख भागेश बबलाद आदीच्यां हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.