सोलापूर
मराठा आरक्षण शांतता रॅलीत मुस्लिम बांधव सहभागी होणार – तांबोळी

करमाळा ( आयुब शेख ) सोलापूर शहरात उद्या दिनांक ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण शांतता रॅलीत मुस्लीम समाज लहान भावाची भुमिका घेउन रॅलीत सहभागी होणार आहे . जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाबरोबर खांद्याला खांदा लावुन लढणार असल्याची माहिती करमाळा मुस्लीम समाज शहर व तालुका अध्यक्ष उस्मानभाई तांबोळी,नगरसेवक अल्ताफभाई तांबोळी यांनी दिली. मराठा समाज आरक्षण शांतता रॅलीत मुस्लिम बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.