Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याकडे जनतेचे लागले लक्ष !

Admin by Admin
June 2, 2025
in राजकीय
0
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याकडे जनतेचे लागले लक्ष !

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक पाच जून रोजी अक्कलकोटच्या दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या दौऱ्याकडे अक्कलकोट तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.

 काँग्रेस पक्षाचे नेते ,माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्षाला सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले .माजी मंत्री म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा भेट घेऊन चर्चा करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसेच त्यांचे बंधू काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे दिनांक पाच जून रोजी अक्कलकोटच्या दौऱ्यावर येत आहेत. माजी मंत्री म्हेत्रे यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश कार्यक्रम हा मंगरूळ प्रशाले समोरील मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली असून मैदानाची स्वच्छता तसेच भव्य मंडप उभारण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासासाठी भरीव निधीची घोषणा करणार का ? याकडे अक्कलकोटकरांचे लक्ष लागले आहे. माजी मंत्री म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात कोणकोणते नेते त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अक्कलकोट येथे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेशासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा लागले असून या कार्यक्रमाची राजकीय पटलावर चर्चा सुरू आहे.
Previous Post

शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून माजी मंत्री म्हेत्रे यांचा सत्कार

Next Post

परंडा बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन संपन्न

Admin

Admin

Next Post
परंडा बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन संपन्न

परंडा बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697