महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यानी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कुरनूर धरणाची केली पाहणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अक्कलकोट शहर व तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी . एस. कार्तिकेय
व अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या समवेत कुरनूर धरणाची पाहणी करण्यात आली.
धरणातील सद्यस्थिती व उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेत, अक्कलकोट शहरासाठी आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन तसेच आवश्यक पर्यायी उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पाणीटंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

अक्कलकोटकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद यांच्या समन्वयातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

यावेळी तहसीलदार . विनायक मगर, प्रांताधिकारी . सुमित शिंदे, तालुका कृषी अधिकारी . गौरीशंकर मंगरुळे, मुख्यअधिकारी . रमाकांत डाके, पाणीपुरवठा अधिकारी . मनोज ईश्वरकट्टी, उपनगराध्यक्ष . बंटी राठोड, अक्कलकोट पंचायत समिती सभापती सौ. रश्मी हिप्परगी, बोरामणी गट जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, जेऊर जिल्हा परिषद सदस्य . विकास बुळळा, वागदरी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब किवडे, पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती . देविदास कवटगी, नगरसेवक तथा आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, नगरसेवक महेश हिंडोळे, . नन्नू कोरबू, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button