सुवर्णा कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड

परतूर / जालना ( राम राठोड )डॉ_राजरत्न_आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष_यांच्या आदेशानुसार
दि.17/08/2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जालना येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष .दिनेश हनुमंते उपस्थित होते. यांच्या हस्ते आज सुवर्णा कांबळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष .प्रेमानंद मगरे जिल्हा अध्यक्ष जालना यांच्या सह सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी निळा रुमाल व पुष्पगुच्छ देऊन जाहिर अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने उपस्थित .वैभव धबडगे महाराष्ट्र प्रदेश सचिव .ऑडं रामजी कांबळे जेष्ठ नेते .दादाराव लाहाने .बालासेब बोर्डे .भगवान कांबळे परतूर तालुका अध्यक्ष पॅथर अमोल साळवे अर्जुन गायकवाड जयकुमार मोरे सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



