Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भाजपामध्ये आयारामांना पहिली पसंती – बसवराज हौदे

Admin by Admin
August 15, 2024
in राजकीय
0
भाजपामध्ये आयारामांना पहिली पसंती – बसवराज हौदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
सोलापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट मध्ये  काॅग्रेस मधून आलेले आयारामांना भाजपा मध्ये पहिली पसंती मिळाली.परंतु लोकसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी निवडणूकी पासून लांब ठेवले गेले.घरच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता लोकसभा निवडणूक पार पडली.परंतु अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांन मध्ये प्रचंड खदखद सुरू आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष बसवराज हौदे यांनी दिली.
सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांचा दारुण पराभव हा विधानसभेच्या तोंडावर फार मोठा झटका बसले परंतु अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात निष्ठावंत कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा विचार केला जाईल अशी अपेक्षा होते परंतु तसे काहीच दिसत नाही.
गेल्या लोकसभेला व विधानसभेला मिळालेला मताधिक्यचा विचार केला तर.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव जिव्हारी लागले.
गेल्या विधानसभेला भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी जोमाने काम करुन आमदार सचिन कल्याणशेट्टी व भारतीय जनता पक्षासाठी अहोरात्र झटुन रक्ताचे पाणी करून विजयाचा मार्ग सुकर केला आहे.
परंतु अलिकडच्या काळात दुधनी सह अक्कलकोट तालुक्यात अनेक कार्यकर्ते नाराज आहेत.२०१९ विधानसभेला काॅग्रेस पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला विरोध केलेल्या आयाराम लोकांना आज भारतीय जनता पक्षात जास्त महत्त्व आल्याने.निष्ठावंत कार्यकर्ते लांब आहे हे वस्तुस्थिती आहे.म्हणुन महाराष्ट्र राज्य भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संदेश पाठवले की  अक्कलकोट तालुक्यात अनेक निष्ठावंत कार्यकर्ते रक्ताचे पाणी करून विजयाचा मार्ग सुकर केला होता परंतु आज निष्ठावंत कार्यकर्ते वाऱ्यावर आहे अशी विनंती केले.आणि त्वरीत सोलापूर लोकसभा प्रभारी श्रीकांत भारतीय यांच्या बरोबर फोन सविस्तर चर्चा अंती सांगितले की  अक्कलकोट तालुक्यात आयाराम लोक केवळ स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी आले पक्ष वाढीसाठी आले नाही कार्यकर्त्यांना वाटोळे करण्यासाठी आले आहे. आपण अक्कलकोट वर विशेष लक्ष घालावे म्हणून विनंती केले आणि माझ्या विनंतीला आमदार श्रीकांत भारतीय यांनी  सकारात्मक विचार करून तोडगा काढू म्हटले आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष बसवराज हौदे यांनी दिले.

Previous Post

गवंडी समाज- व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचा ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न.

Next Post

आई कर्ज भाकरीचे..!!

Admin

Admin

Next Post
आई कर्ज भाकरीचे..!!

आई कर्ज भाकरीचे..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697