Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गवंडी समाज- व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचा ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न.

Admin by Admin
August 15, 2024
in सामाजिक
0
गवंडी समाज- व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचा ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचा शुभारंभ.
अक्कलकोट ( प्रतिनिधी )  –  येथील नामधारी क्षत्रिय गवंडी समाज अक्कलकोटच्या वतीने शहरातील बुधवार पेठ येथील गवंडी समाजाच्या श्री वेंकटेश्वर देवस्थानच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मंगळवार  दिनांक १३/०८/२०२४ तिथी श्रावण शु ८  उत्सवरोजी पहाटे ५ वाजता पारंपरिक पद्धतीने देवस्थानचे पुजारी पवन देसाई यांनी काकडआरती केली. सकाळी ६ ते ७ या वेळेत पारंपरिक पद्धतीने श्रीना तुपाचे अभिषेक करण्यात आले. तदनंतर सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर दर्शनाकरीता भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. उत्सवानिमित्त मराठवाड्यातील लातूर येथून भजन व दिंडी मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता श्रींच्या सजविलेल्या पालखीचे पूजन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांचे हस्ते संपन्न होऊन पालखी मिरवणुकीचे शुभारंभ करण्यात आले. या पालखी मिरवणुकीत वाजंत्री, भजन, दिंडी इत्यादींचा सहभाग होता. पालखी मिरवणुकीचे प्रस्थान सकाळी १० वाजता बुधवार पेठ येथील मंदिरातून निघून कारंजा चौक, मौलाली गल्ली, आझाद गल्ली, डबरे गल्ली, देशमुख गल्ली, नवश्या मारुती मार्गे मेन रोड, फत्तेसिंह चौक, सेंट्रल चौक, कापड बाजार, कारंजा चौक, विजय चौक, बस स्टॅन्ड समोरून हसापुर रोड, खासबाग, हन्नूर चौक, बुधवार पेठ येथील मंदिरात दुपारी २ वाजता पालखीचे आगमन होऊन मंदिरास पालखी प्रदक्षिणा करून पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ करण्यात आला. या पालखी सोहळ्यास शहरातील हजारो भाविक व समाज बांधव उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व सेवेचा लाभ घेतला. 
       तत्पूर्वी पालखी पूजनास व आरतीस उपस्थित असलेल्या बसलिंगप्पा खेडगी यांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत गवंडी, व विश्वस्त सचिव अप्पाशा गवंडी, बसवराज गवंडी यांच्या हस्ते करण्यात आला. दुपारी २ वाजता सर्व भाविकांना व सेवेकऱ्यांना देवस्थानच्या वतीने भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी व्यंकटेश मंदिराचे पुरोहीत पवन देसाई, विश्वस्त श्रीशैल गवंडी, श्रीमंत चेंडके, भीमाशंकर गवंडी, अशोक गवंडी, सुनील गवंडी, विजय गवंडी, बसवराज गवंडी, देविदास गवंडी, महेश गोगी, परतरेड्डी गवंडी, श्रीशैल गवंडी, अंबादास गवंडी, भिमशा गवंडी, भिमाशंकर दुधनीकर, बाबूराव गवंडी, सचिन पेठकर, मल्लिकार्जून गवंडी, यलप्पा गवंडी, श्रीनिवास बहिरेवार, गोकुळ गवंडी, अमोल गवंडी, रमाकांत राजापूरे, राजू राजापूरे, राजू गवंडी, सन्मुख गवंडी, पप्पू गवंडी, मनोज गोगी, विजयकुमार गोगी, अभिषेक गोगी, संदीप दुधनीकर, श्रीशैल गवंडी, संदीप आमले, काशिनाथ गवंडी, गोविंद गवंडी, संजय गवंडी, दौलप्पा गवंडी, परमेश्वर गवंडी, श्रीशैल राजापूरे, सिद्धलिंग गवंडी, रमेश डण्णूरे, सुभाष तारापूरे, श्रीकांत गवंडी, पंढरीनाथ गवंडी, व्यंकटेश धोत्रीकर, महेश गवंडी, गणेश चेंडके आदींसह समाजबांधव व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत रासपची तहसीलदारांकडे मागणी

Next Post

भाजपामध्ये आयारामांना पहिली पसंती – बसवराज हौदे

Admin

Admin

Next Post
भाजपामध्ये आयारामांना पहिली पसंती – बसवराज हौदे

भाजपामध्ये आयारामांना पहिली पसंती - बसवराज हौदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697