सामाजिक
हजरत शेख नूरुद्दीनबाबा चिस्ती उर्स शरीफनिमित्त प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट तर्फे महाप्रसाद वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत शेख नूरुद्दीनबाबा चिस्ती उर्स शरीफ निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शेख नुरुद्दिन बाबा यांच्या उर्स निमित आलेल्या सर्व भक्तांसाठी प्रिन्स वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने लंगर कमिटिकडून महाप्रसाद ठेवण्यात आले होते.चिराग(दीपोत्सव) म्हणजेच उर्सच्या प्रमुख दिवशी सकाळी ०९:०० ते रात्री११:०० वाजेपर्यंत हजारो भाविकांनी लंगर महाप्रसादाचा लाभ घेतला, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था ही करण्यात आली होती. सध्या श्रावण असल्यामुळे शाहकारी मसाला भातची स्वतंत्र व्यवस्था ही करण्यात आली होती.अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
या वेळी प्रिन्स वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद अब्दुल राऊफ कादरी पिरजादे साहेब,रजाक सय्यद, बशीर घोळले, मुर्तुज बाजे,युसुफ बागलकोटे,एजाज बळोरगी,अखिल मुजावर, अयमद कुरेशी,दाऊद हगलदिवटे,इरफान सातलगाव व प्रिन्स वेल्फेअर ट्रस्टचे कार्यकर्ते उपस्थित होत.
