सामाजिक

विवेकानंद प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमालाचे आयोजन

     अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- विवेकानंद प्रतिष्ठानचे गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला यंदाच्या वर्षी गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२५ दरम्यान दररोज सायं.६.३० वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन, कमलाराजे चौक, अक्कलकोट येथे होणार असल्याची माहिती विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. सालाबादाप्रमाणे यंदाही विवेकानंद प्रतिष्ठानचे वतीने अक्कलकोटकरांसाठी नामवंत व्याख्यात्याची विविध कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमाला ७ दिवस चालणार आहे.या व्याख्यानमालेचे हे १४ वे वर्ष आहे.
पाहिले पुष्प गुरुवार, २८ ऑगस्ट -महाराष्ट्रातील गड व किल्ले
 वक्ते विनायक खोत 
अध्यक्ष, 
शिवाजी ट्रेल ट्रेल दुर्गसंवर्धन संस्था
दुसरे पुष्प शुक्रवार,२९ ऑगस्ट
सायबर फ्रॉड हनीट्रॅप व आपण
 वक्ते – डॉ धनंजय देशपांडे सायबर तज्ञ, पुणे
तिसरे पुष्प शनिवार, दि.३० ऑगस्ट -देवी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांवरील नाटीका
सादरीकरण : रश्मी देव ,चौथे पुष्प – रविवार, ३१ ऑगस्ट -आनंदडोह
राजयोग निर्मित स्नेह पुणे सादर करीत
संत तुकारामांवरील नाटीका
लेखन- श्री योगेश्वर, 
दिग्दर्शन – आनंद स्वरूप 
संगीत – श्री केदार दिवेकर 
सादरकर्ते – योगेश सोमण
पाचवे पुष्प, सोमवार,०१ सप्टेंबर -उत्सव लोकगीतांचा –
सादरकर्ते – स्वप्नील रास्ते 
गायक कलाकार – 
सुजित सोमण, अमिता घुगरी, 
जयंत पानसरे,  देविका दामले
सहावे पुष्प – मंगळवार, २ सप्टेंबर 
श्वासात राजं ! ध्यासात राजं !!
कलाकार : अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, अवधूत गांधी
सातवे पुष्प, बुधवार, ३ सप्टेंबर -ऑपरेशन सिंदूर ! पराक्रम अभूतपूर्व !!
वक्ते –
एअर मार्शल – 
प्रदीप पद्माकर बापट –
सेवा निवृत्त 
विंग कमांडर – अविनाश मुगळ – सेवा निवृत्त
या विषयावर गुंफणार आहेत.
      या व्याख्यानमालेत साहित्य, व्यवस्थापन, अभिनय, जीवन या विषयावर चतुरस्त्र व्याख्यान होणार आहे तरी अक्कलकोट तालुक्यातील रसिकांनी व विशेषता तरुण-तरुणी या व्याख्यानमालाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. यावेळी प्रतिष्ठान सदस्य अशोक येणगुरे मनोज कल्याणशेट्टी मल्लिकार्जुन मसुती विलास कोरे संतोष जिरोळे नितीन पाटील निनाद शहा निरंजन शहा मल्लिकार्जुन आळगी अमोल कोकाटे महेश कापसे प्रदीप पाटील गुरुपदप्पा आळगी मल्लिनाथ मजगे चंद्रकांत दसले आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button