दलित पँथरच्या महिला पदाधिकाऱ्याचां माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार

दलित पॅंथरच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सांगोला येथील जयश्री मल्हार सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली. तसेच सांगोला तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी माधुरी दामानी यांची व विविध महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सदरची निवड ही दलित पँथरचे पक्षश्रेष्ठी मल्लिका नामदेव ढसाळ व राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे यांच्या आदेशाने दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे यांच्या मार्गदर्शनाने निवड करण्यात आली. या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा सांगोला येथे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व दलित पॅंथरच्या महिला पदाधिकाऱ्यांना पुढील कार्य माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सिद्धनाथ हॉस्पिटल सांगोला येथे सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर पठाण कुटुंबीयांकडून दलित पॅंथरच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दलित पॅंथरच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी गेजगे, अर्चना रूपनर ,सुरेखा गाडे ,रूपाली ढावरे, मनीषा कांबळे , रूपाली गाडे ,विद्या माने , नंदा वाघमारे , रेखा साळवे , रूपाली गोरे , रुक्मिणी पेवळे, साधना चव्हाण , संध्या काटे , शोभा शिंदे , हौसाबाई ऐवळे , रूपाली रणदिवे , सविता गेजगे, कलावती डोके , प्रणाली कुरणे, वैशाली खांडेकर , सुवर्णा मोरे , कांचन जाधव , राशद खतीब आदी उपस्थित होते.



