Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

उजनीतून एकरुख उपसा सिंचन योजनेत दि 20 पासून पाणी सोडणार ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने येणार पाणी 

Admin by Admin
August 18, 2024
in टॉप न्यूज
0
उजनीतून एकरुख उपसा सिंचन योजनेत दि 20 पासून पाणी सोडणार ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने येणार पाणी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट, ( प्रतिनिधी ) : चालू वर्षाच्या पावसाळ्यात उजनी धरणाचा पाणीसाठा शंभर टक्केच्या वर झाल्याने आणि उजनी खालील लाभक्षेत्रात या वर्षाचा पावसाळा अत्यंत तोकडा झाल्याने उजनी भरल्यानंतर भीमा नदीत पाणी सोडले जाते त्याऐवजी जिथे पाणी टंचाई आहे त्या भागातील शेतीला आणि नागरिकांना पाणी मिळावे यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने आज बैठक पार पाडले आणि दिनांक 20 ऑगस्ट  पासून बोरी मध्यम प्रकल्प एकरूप उपसा सिंचन योजनेत पाणी सोडण्याचा आज निर्णय झाला. या निर्णयाने अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर भागातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या अनेक गावांना मोठा लाभ होऊन पाणी टंचाई पासून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीसच आमदार 
कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती. परंतु कालव्यामध्ये साचलेलं मोठ्या प्रमाणात गाळ, वाढलेले झाडेझुडपे, त्याला पडलेल्या प्रचंड भेगा, त्यात साचलेला गाळ या सर्व अडथळ्याने तिथे पाणी सोडता आले नाही. गेल्या पंधरा दिवसात सातत्याने प्रयत्न करून त्या कालव्यातील सर्व कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत त्यामुळे असलेली सर्व अडथळे आता दूर झालेले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय झालेला असून सोडलेले पाणी कुरनूर धरणापर्यंत पूर्ण क्षमतेने आणि वेगाने येण्यास मदत होणार आहे.उजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला असून नदीद्वारे व कालव्याद्वारे विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. सदरचे पुराचे पाणी वापरून बोरी मध्यम प्रकल्प व एकरुख उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील इतर तलावात सोडण्याची मागणी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे केलेली होती. सदर मागणीस अनुसरून दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीत दि. २० ऑगस्ट २०२४ पासून एकरुख उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणेबाबत जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सहमती दर्शवली आहे.जलसंपदा विभागाकडून कारंबा शाखा कालव्यातील गाळ काढण्याचे काम तसेच कारंबा पंपगृह व एकरुख उपसा सिंचन योजनेच्या हगलूर पंपगृह व बोरामणी पंप गृहातील यांत्रिकी व विद्युत विभागाची सर्व कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी दिली. एकरुख उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील बोरी मध्यम प्रकल्प, दर्गनहळळी, कर्देहळळी, रामपूर व आवश्यकतेनुसार अन्य लगतच्या तलावात पाणी सोडण्याबाबतचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस आ. सचिन कल्याणशेट्टी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. ज्ञानदेव बागडे, धीरज साळे महसूल उपजिल्हाधिकारी श्री. अमृत नाटेकर, कार्यकारी अभियंता श्री. धनंजय कोंडेकर, श्री. मोहन जाधवर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
चौकट –
सचिन कल्याणशेट्टी,
आमदार, अक्कलकोट 
 मागील वर्षी उजनीत कमी पाणीसाठा असल्याने बोरी मध्यम प्रकल्प एकरूप उपसा सिंचन योजनेत पाणी सोडता आले नाही त्याचवेळी पुढील वर्षी योजने शंभर टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याचा नियोजन करण्यात आला होता. यावर्षी मागील आठवड्यात उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर सतत पाठपुरावा करून त्या अनुषंगाने आज बैठक होऊन 20 ऑगस्ट पासून पाणी सोडण्यास प्रारंभ होणार आहे. कमी पावसाळ्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असताना  सदर दोन्ही योजनेत पाणी सोडल्याने या भागातील शेतकरी आणि नागरिक यांच्या पाणीटंचाईची अडचण दूर होणार आहे.

Previous Post

अक्कलकोट येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा संवाद मेळावा संपन्न

Next Post

वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आयोजित समस्त ओबीसी संघटना प्रमुखांची बैठक संपन्न

Admin

Admin

Next Post
वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आयोजित समस्त ओबीसी संघटना प्रमुखांची बैठक संपन्न

वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आयोजित समस्त ओबीसी संघटना प्रमुखांची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697