Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

उजनीतील ओव्हरफ्लो पाणी कुरनुर धरणात सोडा..

Admin by Admin
August 2, 2024
in टॉप न्यूज
0
उजनीतील ओव्हरफ्लो पाणी कुरनुर धरणात सोडा..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
अक्कलकोट ( प्रतिनिधी- )सध्या पुणे जिल्ह्यात पावसाची समाधानकारक हजेरी असल्याने जिल्ह्याची वरदायिनी ठरलेले उजनी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार आहे. परंतु अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेले कुरनुर धरण मात्र भरले नाही.ही विसंगत परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यात उजनीतील ओव्हरफ्लो होणारे पाणी एकरुख योजनेच्या माध्यमातून तात्काळ कुरनूर धरणात सोडण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करा अशा प्रकारची मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आले.
                मागील वर्षी एकरूख योजनेचे यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.म्हणून या योजनेद्वारे पाणी सोडल्यास अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या पाणीप्रश्नी मदत होणार आहे.ही बाब माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सांगितली.कुरनूर धरणावर दुधनी, मैंदर्गी,अक्कलकोट या नगरपालिकांसह ५२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.बहुतांश लोकांची शेती या धरणावर अवलंबून आहे.निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्यापही कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.यामुळे भविष्याची चिंता वाढत चालली आहे.ही चिंता मिटावी यासाठी उजनी धरणातील ओव्हरफ्लो पाणी कुरनुर धरणात सोडण्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी म्हेत्रे यांनी केली.कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत याविषयी बोलणार असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
                   तर म्हेत्रे यांच्या मागणीवर निश्चितपणे कार्यवाही करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, सिद्धार्थ गायकवाड,मल्लिकार्जुन पाटील,सोमनाथ चिकलंडे,आप्पा हलसगे,बसवराज माळी आदी उपस्थित होते.
Previous Post

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राजाई इंग्लिश मीडियम स्कूल नरसी येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

वानराच्या धडकेतील पिंपळी धामणगाव येथील व्यक्तींचा मृत्यू

Admin

Admin

Next Post
वानराच्या धडकेतील पिंपळी धामणगाव येथील व्यक्तींचा मृत्यू

वानराच्या धडकेतील पिंपळी धामणगाव येथील व्यक्तींचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697