महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांचे सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने स्वागत

सोलापूर ( रमेश सुरवसे )मुंबईचे माजी महापौर, महाराष्ट्र शासनाचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा विद्यमान राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार . चंद्रकांत हांडोरे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत वंचित, शोषित, उपेक्षित आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
ज्येष्ठ नेते चंद्रकांत हांडोरे यांचे सोलापूर शहरात आगमन झाल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, उपाध्यक्ष संजय गायकवाड, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्ष उमेश सुरते, नागनाथ बंगाळे , सुभाष वाघमारे, विवेक कन्ना, भीमराव शिंदे, मयूर तळभंडारे, माया कांबळे, व्यंकटेश बोमेन, ज्योतीताई गायकवाड, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, पवन सग्गम, चिंटू कांबळे, शब्बीर शेख, श्रीनिवास परकीपंडला आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.



