राजकीय

अक्कलकोट  तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी  सिद्धाराम बाके तर  उपसभापती पदी  निंगप्पा पुजारी यांची निवड 

 
अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट  तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी  सिद्धाराम बाके तर  उपसभापती पदी  निंगप्पा पुजारी यांची निवड करण्यात आली. सदरची निवड ही गुरुवारी दुधनी कृउबा समिती सभागृहात करण्यात आली.
अक्कलकोट  तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाकरिता भाजपकडून सिद्दाराम बाके तर शिवसेना शिंदे गटाकडून शिवानंद पाटील यांच्यात व उपसभापती करिता भाजपकडून निंगप्पा पुजारी तर शिवसेना शिंदे गटाकडून इराणा धसाडे यांच्यात गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपाचे नूतन सभापती म्हणून सिद्दाराम बाके तर उपसभापती म्हणून निंगप्पा पुजारी यांची १३ विरुद्ध ५ मतांनी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. गावडे यांनी काम पाहिले.
   या निवडणुकीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी भाजपाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, सोलापूर बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, दुधनी बाजार समितीचे संचालक देवेंद्र बिराजदार, सातलिंगप्पा परमशेट्टी, मल्लिकार्जुन झळके, वाहिदपाशा शेख, विश्वनाथ नागुर, मोतीराम राठोड, सुवर्णा मचाले, अश्विनी सालेगाव, सिद्दाराम तोलनुरे, विश्वनाथ कोगनुर, रमेश पाटील यांच्यासह अक्कलकोट मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, अमोल हिप्परगे, सुनील खेड, मैदर्गी नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, जिल्हा परिषद सदस्य सिद्दाराम शिवमूर्ती, विकास बुला, शिवानी स्वामी, नगरसेवक यशवंत घोंगडे, महेश हिंडोले, महेश इंगळे, देविदास कवठगी, कांतू धनशेट्टी, सद्दाम शेरीकर, नाविक डांगे, नन्नुभाई कोरबू, पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, विलास गव्हाणे, आप्पासाहेब कवडे, महेश पाटील, अतुल मेळकुंदे, शंकर भांजी, बसवराज हौदे यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन २०२३ मध्ये झालेल्या दुधनी कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय
जनता पार्टीने बाजार समितीवर सत्ता काबीज केली. तर
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पॅनलला केवळ
६ जागांवर समाधान मानावे लागले होते. प्रथम
अप्पू परमशेट्टी यांची सभापती पदी तर उपसभापती
सिद्धाराम बाके यांची निवड करण्यात आली होती.
गत पंधरा दिवसा खाली सभापती व उपसभापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. यामुळे नूतन सभापती व उपसभापती पदी
कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून
राहिले होते. अखेर आमदार सचिन कल्याणशेट्टी
यांच्या नेतृत्वाखाली सभापती म्हणून सिद्धाराम बाके
तर उपसभापती म्हणून निंगप्पा पुजारी यांची निवड
करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button