महाराष्ट्र

महिला देशाची सर्वात मोठी ताकद – राहुल गांधी

पुणे : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (२२ ऑगस्ट २०२४) पुण्यात पार पडला आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून मागील काही दिवसांपासून मोठी तयारी सुरू होती. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते पुण्यात ठाण मांडून होते. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा चौथा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी ‘जेन झी’शी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले आहे.
दिल्लीतील ‘जेन झी’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात होता. ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पुण्यात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी ‘जेन झी’शी संवाद साधत महत्त्वाचे भाष्य केले आहे. ‘महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे’, असं म्हणत राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवरून जोरदार टीका केली.
मी आज या ठिकाणी राजकारणावर बोलण्यासाठी आलेलो नाही. तरुणांची संख्या ही भारताची मोठी ताकद आहे.
राहुल गांधी यांनी सांगितली धक्कादायक आकडेवारी
अनेक विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर जाऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले काही धक्कादायक अनुभव देखील सांगितले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी एक आकडेवारी सांगत देशातील हिंसाचार, बलात्कार, विनयभंग अशा घटनांची धक्कादायक आकडेवारी सांगितली आहे.
मला अनेकदा विचारलं जातं की भारताची ताकद काय आहे? हा प्रश्न विचारल्यावर अनेक उत्तरे मिळतात. कोणी म्हणतं की आपली अर्थव्यवस्था, कोणी म्हणतं की आपलं सैन्य, कोणी म्हणतं की आपली आरोग्य व्यवस्था, तर कोणी कदाचित आपली लोकसंख्या असंही म्हणेल. पण भारताची खरी ताकद ही ७० कोटी भारतीय महिला आहेत असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button