सामाजिक
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून व निधीतून नागणसूर–मणूर रस्त्याच्या सुधारणा कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून व निधीतून मंजूर झालेल्या नागणसूर इजिमा १२८ ते मणूर रस्ता, ग्रा. मा. २०६, सा. क्र. ०/०० ते २/०० या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामाचे बुधवारी भूमीपुजन करण्यात आले. अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
₹७० लाखांचे मंजूर अनुदान असलेल्या या कामामुळे नागणसूर, मणूर परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे. रस्त्याची सुधारणा झाल्यानंतर दळणवळण अधिक सुलभ, सुरक्षित आणि गतिमान होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
३०५४-३०१२ जिल्हा वार्षिक योजना – ग्रामीण रस्ते विकास, सन २०२५-२६ अंतर्गत मंजूर झालेल्या या विकासकामासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल नागरिकानी आभार मानले.
यावेळी . सिद्धाराम शिवमूर्ती (जिल्हा परिषद सदस्य, नागणसूर), . कांतू धनशेट्टी (नगरसेवक),.सिद्धाराम तोळणुरे (संचालक कृषी उत्पन बाजार समिती, दुधनी), . प्रसाद प्रचंडे (तंटामुक्त अध्यक्ष), मल्लिनाथ भासगी (सामाजिक कार्यकर्ते), . वीरभद्र सलगरे (सामाजिक कार्यकर्ते), . विश्वनाथ प्रचंडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), . अरविंद कोणापुरे, शिवपुत्र धनशेट्टी, . धर्मागुरूजी प्रचंडे, . बसवराज मटगी (ग्रामपंचायत सदस्य, नागणसुर),.अजित धनशेट्टी, . बसवराज खेड,. शरणाप्पा तोळणुरे, शरदचंद्र गगोंडा, पप्पू खेड, . सिद्धू गुरव,. प्रकाश दुधनीकर, . मलकरी दोडमणी, . बसवराज हेगडे, इरेश सालुटगी, अप्पू गगोंडा,. रुद्रमणी कोनापुरे, . सद्दू थंब तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



