सामाजिक

शिंगडगावच्या शेतकऱ्याने टोमॅटोला भाव नसल्याने दीड एकरात  फिरविला नांगर !

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगावच्या शेतकऱ्याने टोमॅटोला भाव नसल्याने दीड एकरात नांगर फिरविला आहे. पुन्हा एकदा बळीराजाला हमीभाव नसल्याने पदरात निराशा पडली आहे . शिंगडगावचे शेतकरी बसाण्णा नागणसूरे यांनी दीड एकरात टोमॅटोची लागवड केली होती. या लागवडीसाठी त्यांना दीड ते दोन लाख रुपये खर्च झाला होता. टोमॅटोसाठी चार महिने दिवस रात्र घाम गाळला .कर्ज काढले ,खते ,औषधे, मजुरी यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला. पण बाजारात टोमॅटोला दर फक्त दोन ते तीन रुपये मिळाला. एका कॅरेट मध्ये वीस किलो टोमॅटोचे वजन होते. बाजारभाव केवळ 60 रुपये मिळाले. टोमॅटो लागवडीसाठी झालेला खर्च आणि नफा यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी बसण्णा नागणसूरे यांनी संपूर्ण रानात नांगर फिरविला आहे .चार महिने मेहनत करून लाखो रुपये खर्च करून जर भाव मिळत नसेल तर शेतात पीक ठेवायचे का असा सवाल शेतकरी बसण्णा नागणसूरे यांनी उपस्थित केला आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button