Thursday, September 10, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बैल पोळ्याच्या निमित्ताने एक आठवण !

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 10, 2026
in सामाजिक
0
बैल पोळ्याच्या निमित्ताने एक आठवण !

Oplus_16908288

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मी साधारण सातवीत होऊन आठवीत गेलो होतो ,, माझे वडील मुळचे जेवरी तालुका निलंगा येथील मूळचे रहिवाशी , माझ्या आजोबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी नुसार आमच्या समाजाची जहागिरी सोडली , निजाम स्टेट मध्ये थेट बिदर विभागातील जात पंचायत प्रमुख होते , यातून मोठा संघर्ष झाला आणि माझ्या आजोबांनी खेडे सोडून निलंगा येथे रहिवासास सुरुवात केली , निजाम स्टेट द्वारे मिळालेल्या साधारण अर्धा एकर रहिवाशी जागेत ते राहू लागले , पण मराठवाड्यातील सतत चां दुष्काळ या मुळे इयत्ता 9वी मधून ते 1953/54साली पुण्या कडे आले ,, आणि तेथेच ते बांधकाम व्यावसायिक होऊन सणसर साखर कारखाना सिव्हील बांधकाम ठेकेदार म्हणून काम पाहू लागले , पुढे कै सहकार महर्षी शंकर राव नारायण राव मोहिते पाटील साहेब हे आमदार असताना स्वतः सहकार कारखानदारी करण्याच्या निर्मिती साठी कारखाना पाहणी साठी
सणसर येथे आले होते , ते आमदार तर होतेच पण महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे खजिनदार या पदावर होते , प्रचंड कर्तुत्व , जबरदस्त वक्तृत्व आणि वसंत दादा यांच्या निकटचे सहकारी होते , त्या मुळे त्यांच्या स्वागताची जबरदस्त तयारी झाली होती
माझे वडील आंबेडकरी चळवळीत होते , रिप ऐक्यासाठी मुंबई येथे उपोषण ही त्यांनी केले होते आणि त्यांचे वक्तृत्व ही जबरदस्त होते ,,
अर्थात या मुळे तेथे त्यांना भाषण करायला लावले , कै काकासाहेब यांना ते इतके आवडले की त्यांनी माझ्या वडिलांना अकलूज ला येण्यास सांगितले ,
आणि सदाशिवराव माने पाटील विद्यालय व इतर बांधकामे दिली ,
पुढे 1975/76चे काळात सीलिंग ॲक्ट आला आणि साहेबांनी शिफारस केल्या मुळे तत्कालीन वाटप नियमा नुसार सर्वात अधिकची जमीन माझ्या वडिलांना मिळाली ,
अर्थात आमचे नातेवाईक म्हणून आईचे माहेरचे म्हणजे करकंब येथील सर्व नातेवाईक , आईचे भाऊ , आईच्या बहिणी , त्यांची मुले , असेच नातेवाईक आमच्या संपर्कात अधिक राहिले ,,
शेत वस्तीवर असा 20/22नातेवाईक मंडळींचा कायमचा अधिवास होता ,
शेती कसण्यासाठी बैल आवश्यक होते , म्हणून मुसलमान वाडी (इंदापूर तालुका जिल्हा पुणे) हे नदी पलीकडील गाव तेथील त्या काळचे मोठे शेतकरी मौला शेख , काझी साहेब , माजी सरपंच उसमन शेख यांचे वडील अश्या अनेकांना सोबत घेऊन माझ्या वडिलांनी नवीन बैल जोडी खरेदी केली , त्या सोबत बैल गाडी ही होती ,
“सुरत्या” नावाचा बैल (आंडील)होता नावाप्रमाणे तो देखणा होता , कोस्या रंगाचा आणि डोळ्यात काजळ घातल्या सारखा उंचा पुरा व सुडौल बांध्याचा,,पण
तो प्रचंड रागीट होता , त्याची शिंगे उंच व कानाला समांतर तासिव आणि अतिशय तीक्ष्ण होती , दोन कासरे बांधल्या शिवाय त्या बैला ला हात लावणे अवघड होते , तो अतिशय स्फूर्ती चां आणि कामात ही वाघ होता ,,
दुसरा ” नकाशा” हा पूर्ण पांढरा आणि अवाढव्य होता , नंदी बैला सारखी याच्या शिंगाची बनावट होती पण तो “चेपलेला ” होता
त्या मानाने तो शांत होता , पण तितकाच तो विश्वास घातकी ही होता , अचानक लहर येऊन तो कधी कुणाला मारेल याची कोणतीच शाश्वती कुणालाच नव्हती ,,,,
पण या बैलांना माझी सवय झाली ,, मी एकटा त्यांना नदीवर पाणी प्यायला घेऊन जायचो त्यांना आंघोळ घालायचो , वैरण गवत आणि भरपूर शेंगदाणा पेंड खाऊ घालायचो ,,
एकदा असेच त्यांना नदीवर घेऊन गेलो , जाताना नकाशा ला मी काठीने मांड्यावर एक तडाखा दिला होता , बैल पाणी पाजून आणले आणि मोकळ्या शेतात चरायला घेऊन जाताना अचानक नकाशा शेपूट वर करून गरकन माघारी वळला आणि मला एका धडकेत खाली पाडले ,, तो मागे सरकला आणि पुन्हा शिंगे रोखून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर धाऊन आला ,,
मी समय सूचकता दाखवून हातातील काठीने त्याच्या नाकावर एक तडाखा दिला ,, आणि नकाशा माघे वळला ,, जणू कांहीं झालेच नाही अश्या आविर्भावात निवांत चरू लागला •
आमच्या शेतात कामाचा एक गडी होता “शिवा देढे ” आम्ही त्यांना शिवा मामा म्हणायचो ,,
बैल कामाशिवाय ठेवले तर ते फक्त माजतात असा सल्ला माझ्या वडिलांना दिला गेला ,,
बहुतेक शिवा मामाने सांगितले असेल , झाले जवळची शुगर फॅक्टरी म्हणून दीं सासवड माळी शुगर फॅक्टरी ऊस वाहतुकी साठी ते बैल वापरले गेले , घरची बैलगाडी , माझा सख्खा मामा गोविंद शिंदे पूर्णतः अशिक्षित , आणि दुसरा मामा गोपाळ शिंदे केन यार्ड ऑफिसर म्हणून आत्ता निवृत्त ,,,
गोविंद मामा आणि शिवा मामा दोघे ऊस तोड करत , मुसलमान वाडी येथील अजून ७/८ बैल गाड्या यांचा ताफा सोबतीला ,,
वैरणीची, व पेंढीची सोय होईल म्हणून आमची बैल जोडी नेली ,,
त्या काळी आधुनिक बजाज टायर चे बैल गाड्या नसायच्या , साध्या लाकडी चाकावर लोखंडी धाव चढवून बसवलेली चाके , ओल्या काळया जमिनीत खोलवर घुसायची ,, आणि सगळे बैल जिथे शरणागती स्वीकारायचे तिथे आमची बैल जुपून गाड्या बाहेर काढल्या जायच्या ,,
हे एका अर्थाने त्यांचे शोषण होते ,,
मी ही कधी कधी त्यांच्या सोबत जायचो ,,
मी हे पहायचो पण मला यातील समजत नव्हते ,, यातून बैल आतून दुखावले , ते व्याधीग्रस्त झाले
ऊस तोड व ऊस वाहतूक बंद केली पण सुरत्या आजारी पडला ,,
कुणीतरी सांगितले त्याला डुकराचे तेल पाजा ,,
डुक्कर हे मुस्लिम आणि नवबौध्द समाजात ही कुणी खात नसायचे त्या मुळे ते कुठून आणायचे ?
या प्रश्नाची सोडवणूक माझ्या वडिलांनी केली
माळीनगर येथील भटके विमुक्त डोंबारी समाजाचे राज्य प्रमुख पंच
शंकर यांनी ते बाटल्यातून आणून दिले ,
माझे वडिलांनी त्यांना स्थाईक केले होते व शासनाकडून त्यांच्या वसाहती साठी जागा दिली होती ,,
लक्ष्मण माने , आसाराम जाधव , बाळकृष्ण रेणके अश्या मंडळी नी शोध यात्रा काढली होती त्याचा मेळावा माळीनगर येथे माझ्या वडिलांनी घेतला होता
जात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा त्यांचा स्वभाव यातूनच आमची जडण घडणं झाली
तर हे तेल कुणी पाजायचे ? हा यक्ष प्रश्न घरात पडला , मी आणि माझा मावस भाऊ भारत जानराव ,, दोघानी ते पाजले आणि अर्धा तास आम्ही हाताला साबण लावून हात धुत बसलो होतो.
ते बैल वारले ,, त्यांना मीठ आणि नवीन पांढरे कापड पांघरून बांधात चीरनिद्रेसाठी दफन केले
, बैल पोळा आला की आज ही आम्ही त्याची पूजा करतो , कृतज्ञतेने माथा टेकवून वंदन करतो ,,
होय ते आमच्या कुटुंबातील सदस्य होते व अजून ही आहेत , भले ते अस्तित्वात नसतील पण आमच्या भावना आणि रोम रोमात त्यांचे अस्तित्व आहे , आणि मी जीवंत असे पर्यंत ते राहीलच,,
“सुरत्या व नकाशा ला भावपूर्ण श्रध्दंजली,,,,” तुम्ही पुन्हा या काम करण्यासाठी नाही पण आराम करण्यासाठी ,, मी तुमची सेवा करेन नक्की करेन हा विश्वास ठेवा.

ॲड. अविनाश टी काले अकलूज
9960178213

Previous Post

बोरेगांव शेतकऱ्यांचे खासदार प्रणिती  शिंदे यांना निवेदन

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158723
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697