माढा येथे युवक काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…

माढा ( प्रतिनिधी )- आज रोजी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने उपाध्यक्ष शाहुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली देशाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. माढा शहरातील सहकारमहर्षी कै.गणपतराव साठे विद्यालय याठिकाणी नगरसेवक शिवाजी जगदाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व, फळांचे वाटप करण्यात आले. यासोबतच आज शाळेमध्ये वृक्षारोपणदेखील करण्यात आले. तसेच, देशाच्या संविधानाबाबत जागृतीसुद्धा करण्यात आली. अशा पद्धतीने राहुल गांधी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शाहुराजे जगताप, सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव समाधान लटके, ओबीसी विभागाचे जिल्हा सरचिटणीस मोतीलाल सुतार, राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप मोरे, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका उपाध्यक्ष जमीर सय्यद, नितीन शिंदे, नगरसेवक शिवाजी जगदाळे, रामचंद्र शिंदे, अनिल त्रिंबके, युवक काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस बालाजी मुजमुले, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश रणदिवे, सलीम पिंजारी, ज्येष्ठ नेते भारत खंडाळे यांच्यासह युवक काँग्रेस संगठन व काँग्रेस पक्षाच्या विविध कक्ष-विभागांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.



