सामाजिक

अक्कलकोट १० कि.मी.  भक्ती रन- २०२६ आयोजन

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आरोग्य ते अध्यात्म” हा प्रेरणादायी संदेश देणारी ही “भक्ती रन” स्पर्धा रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी अक्कलकोटच्या पावन भूमीत आयोजित करण्यात आली असून, शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. या भव्य “अक्कलकोट 10K भक्ती रन” या आगळ्यावेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंकचे उद्घाटन  जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आले.
मॅरेथॉनच्या अधिकृत ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ करत रजिस्ट्रेशन लिंकचे लोकार्पण करण्यात आले. राज्यभरातील धावपटूंना या भव्य “भक्ती रन” मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे नोंदणी करता येणार असून, यामध्ये  ३ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अशा विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी धावपटूंना बिब, टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षिसे, मेडिकल सपोर्ट, पौष्टिक नाश्ता तसेच उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.
भक्ती, फिटनेस आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम घडवणारा हा उपक्रम राज्यभरातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि स्वामी भक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.
चौकट :
धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडाक्षेत्रास देखील महत्व देऊन कार्यरत -*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडाक्षेत्रास देखील महत्व देऊन कार्यरत आहे. म्हणूनच अक्कलकोट १०कि.मी.  भक्ती रन- २०२६ चे आयोजन करण्यात आलेले आहे. 
चौकट :-
नावांची नोंद करण्याकरिता खालील संकेत स्थळाच वापर करावा –
सहभागी होणाऱ्या इच्छुक धावपट्टूनी खालील संकेत स्थळावर नांवे नोंदवावीत असे अवाहन संयोजकांनी केले आहे.
रजिस्ट्रेशन लिंक : https://share.google/O3J3U2IOvaaG9AO2k
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूरचे अध्यक्ष अतिश शहा, मनोज निकम, प्रवीण देशमुख, अभिषेक लोकापुरे, सिद्धेश्वर मोरे, किरण पाटील, निखिल पाटील, वैभव मोरे, पिंटू दोडमनी, शुभम सावंत आदीजन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button