सामाजिक

प्रामाणिकपणाचा आदर्श , बसमध्ये सापडलेली पर्स प्रवाशाला परत

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
रत्नागिरी ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसमध्ये एका प्रवाशाचे पर्स विसरले गेले होते. त्या पर्समध्ये सुमारे १०,००० रुपये रोख रक्कम, तीन तोळे सोन्याचे दागिने, विमानतळाचे तिकीट तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती.
सदर पर्स बसचे चालक सी. एन. वनवडे आणि वाहक पी. सी. कौटगीमठ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते प्रामाणिकपणे सुरक्षित ठेवले आणि संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन पर्स त्यांना परत दिले.अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे युवक वाहक पंचाक्षरी चंद्रकांत कौटगीमठ आणि बस चालक सी. एन. वनवडे यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

या प्रामाणिक कृतीमुळे दोघांचे सर्वत्र कौतुक होत असून, एस.टी. कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button