सामाजिक

श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्यात १५ जोडपी होणार विवाहबद्ध ; १९ एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : जेऊर ता.अक्कलकोट येथे श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने  रवीवार ता. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.४५ वाजता अक्कलकोट रोडवरील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन जेऊर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.यावेळी 15 जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली आहे.यावेळी अनेक मठाधिश महास्वामी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी अक्कलकोट तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि ज्यांचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त आहे अशा सर्व जेष्ठ डॉक्टर्स यांचा सन्मान सोहळा देखील होणार आहे.ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे आर्थिक अडचण तसेच वाढत चाललेली प्रचंड महागाई यामुळे नागरिकांना आपल्या मुलामुलींची लग्ने लावणे आणि त्याची जबाबदारी हे खूपच खर्चिक आणि न झेपणारे ठरत आहे.श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व  बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने यंदा जेऊरला सलग १२ व्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजीला जात आहे.या संस्थेत एकूण २०० पेक्षा जास्त मित्रपरिवार सदस्य एकत्र येऊन तन,मन धनाने योगदान देत आहेत.काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेच्या मल्लिकार्जुन पाटील व मित्रपरिवारांकडून २५५ जोडपे विवाहबद्ध झाली आहेत तर चालू वर्षी एकूण १५ जोडप्यांचा विवाह त्यात्या धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडणार आहे.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.दरवर्षी साधारण पन्नास हजार वर्हाडी उपस्थित राहत असतात.यात प्रामुख्याने वधू वरांना पोशाख, मणी-मंगळसूत्र,वऱ्हाडी मंडळींना,गावातील मुख्य रस्त्यावरून वधू वरांची मिरवणूक, भोजन,शिदोरी आदींची व्यवस्था केली आहे.या विवाह सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशिलिंग बहुउद्देशीय संस्था तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी जेऊर हे करीत आहेत मंडळी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button